Skip to main content

शख्सियत

लक्ष्मीबाई जाधव

जाधव, लक्ष्मीबाई : ( ? १९०१ – ५ मार्च १९६५) हिंदुस्थानी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायिका. तसेच प्रख्यात बडोदा संस्थानच्या दरबार गायिका. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई व वडीलांचे नाव परशराम. दुर्देवाने आई-वडिलांची पुरती ओळख होण्यापूर्वीच ते मृत्यू पावल्याने मावशीने छोट्या लक्ष्मीचा सांभाळ करून मराठी चौथीपर्यंत शिक्षण दिले. निसर्गत: त्यांना देखणेपणाबरोबरच गोड गळाही लाभला होता. लक्ष्मीबाईंच्या मावशीचे पती विलक्षण संगीतवेडे होते.

माणिक वर्मा

वर्मा, माणिक : (१६ मे १९२६ – १० नोव्हेंबर १९९६). सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व सुगमसंगीत गायिका. त्यांचा जन्म पुणे येथे हिराबाई व बळवंत दादरकर या दांपत्यापोटी झाला. त्यांच्या मातोश्री हिराबाई या संगीताच्या उत्तम जाणकार व कलावंत होत्या. त्यांना दत्तूबुवा बागलकोटकर, बापूराव केतकर, बशीर खाँ यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. आपल्या मुलीने सुविद्य गायिका व्हावे असा त्यांचा पहिल्यापासूनचा आग्रह.

मतंग (मतंगमुनी)

मतंग (मतंगमुनी) : एक मध्ययुगीन संगीतरचनाकार आणि आधुनिक रागमालेचे जनक. त्यांच्या जन्म, मृत्यू व जीवनाच्या काळाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही; तथापि दामोदरगुप्ताच्या कुट्टनीमत (इ. स. नववे शतक) आणि अभिनवगुप्त (इ. स. ९५०–१०२०) यांच्या साहित्यात मतंगांच्या संस्कृत भाषेत लिहिलेल्या बृहद्देशी  या ग्रंथातील काही उतारे उद्धृत केले आहेत. त्यावरून मतंगांचा काळ इ. स. आठवे शतक मानला जातो. तसेच मतंगांनी बृहद्देशी  या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे,

‘‘रागमार्गस्य यद् रूपं यन्नोक्तं भरतादिभि: l निरूप्यते तद्स्माभिर्लक्ष्यलक्षण सयुतम्ll’’

भूर्जीखाँ

भूर्जीखाँ : (ॽ १८९० – ५ मे १९५०). जयपूर-अत्रौली घराण्याची गायन परंपरा संक्रमित करणारे एक थोर गायक. त्यांचे पूर्ण नाव शमशुद्दिन गुलाम अहमद ऊर्फ भूर्जीखाँ असून त्यांचा जन्म बुंदी (राजस्थान) येथे झाला. संगीतसम्राट उस्ताद अल्लादियाखाँ यांच्या नसिरुद्दीन (बडेजी), बद्रुद्दीन (मंजीखाँ) व शमशुद्दीन या तीन पुत्रांपैकी हे कनिष्ठ चिरंजीव. भूर्जीखाँ यांना तेजस्वी बुद्धिमत्तेबरोबरच निसर्गदत्त मधुर व पल्लेदार आवाजाची देणगी लाभली होती. त्यांच्या ज्येष्ठ बंधुद्वयांना अल्लादियाखाँची मिळत असलेली तालीम ऐकल्यामुळे विविध रागांतील अनेक बंदिशींचे तसेच अनेक रागांचे संस्कार त्यांच्यावर आपापत: झाले.

भीमसेन जोशी

जोशी, भीमसेन : (४ फेब्रुवारी १९२२ – २५ जानेवारी २०११). महाराष्ट्रातील एक ख्यातकीर्त गायक व संगीतरचनाकार. त्यांचे पूर्ण नाव भीमसेन गुरुराज जोशी. त्यांचा जन्म गुरुराज व रमाबाई या दांपत्यापोटी धारवाड जिल्ह्यातील रोण या त्यांच्या मावशीच्या गावी झाला. त्यांचे मूळ गाव गदगजवळचे होंबळ असून आजोबा भीमाचार्य हे गदगमध्ये स्थायिक झाले होते. ते कीर्तनकार-गायक होते. भीमसेन यांची आईही सुमधुर भजने म्हणत असे, तर वडील गुरुराज हे शिक्षक असून वेदान्तपारंगत होते. त्यांचे घराणे वंशपरंपरागत ज्योतिषी होते.

बृहद्देशी

संगीतशास्त्रकार मतंग यांनी इ. स.चे सातवे ते आठवे शतक यांदरम्यान संगीतशास्त्रावर लिहिलेला एक संस्कृत ग्रंथ. प्राचीन सामगायन व जातीगायन हे गंभीर, नियमबद्ध संगीत लोप पावत चालले असताना व रंजकतेला प्राधान्य देणारे संगीत उदयाला येत असतानाच्या काळात होत असलेली सांगीतिक परिवर्तने या ग्रंथात आढळतात. बृहद् म्हणजे व्यापक. देशी संगीताचे व्यापक स्वरूपात विवरण केले आहे, म्हणून या ग्रंथास बृहद्देशी  हे नाव सार्थ वाटते.

नारदीय शिक्षा

संगीतशास्त्रावरील प्राचीन संस्कृत ग्रंथ. यासनारदी शिक्षा असेही म्हणतात. त्याचा लेखनकाल व कर्ता याविषयी मतभिन्नता असून निश्चित माहिती ज्ञात नाही. काही विद्वानांच्या मते हा ग्रंथ भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथापूर्वीचा असावा; किंवा तो इ.स.तिसऱ्या किंवा सहाव्या शतकातील असावा; या ग्रंथाचे कर्ते महर्षी नारद असून विद्वानांच्या मते नारद या पौराणिक व्यक्तीशी त्याचा काहीही संबंध नाही. शिक्षा ग्रंथ (पाणिनीय, मांडुकी, याज्ञवल्क्य आदी) हे मुख्यत: वैदिक मंत्रांच्या उच्चारणाचे व तत्संबंधीच्या व्याकरणाचे विवेचन करणारे ग्रंथ होत.

देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्यूझिक

संगीतशास्त्राचे शिक्षण देणारी एक ख्यातनाम संस्था. या संस्थेची स्थापना संगीतज्ञ बी. आर. देवधर यांनी १ जुलै १९२५ रोजी मुंबईत केली. हिचे कार्य प्रारंभी प्रार्थना समाज या संस्थेच्या जागेत सुरू झाले. गुरुवर्य विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेतून स्थापन केलेल्या या संस्थेने संगीत क्षेत्रात विधायक कार्य केले. सुरुवातीला संस्थेत अभंग आणि गीते शिकवली जात असत. ती ऐकण्यासाठीच गर्दी होऊ लागली. यातूनच देवधर यांना आपले कार्य पुढे चालविण्यासाठी दिशा मिळाली. राम मोहन शाळा सुटल्यानंतर हे संगीत वर्ग तिथे भरत असत.

दत्तात्रेय विष्णु काणे (काणेबुवा)

काणे, दत्तात्रेय विष्णु : ( २३ फेब्रुवारी १९१९ – १२ ऑक्टोबर १९९७). हिंदुस्थानी संगीतातील एक ख्यातकीर्त गायक. त्यांचा जन्म इचलकरंजी (भूतपूर्व इचलकरंजी संस्थान, कोल्हापूर ) येथे एका सांगीतिक परंपरा असणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील विष्णुपंत हे संवादिनी, तबला आणि सतार ही वाद्ये वाजवीत असत आणि प्रसंगोपात्त कलाकारांना हार्मोनियमची साथही करत असत. इचलकरंजी संस्थानच्या दरबारात ते संवादिनीवादक म्हणून काम करत होते. त्यामुळे दत्तात्रेयांचे प्राथमिक शिक्षण वडिलांकडेच झाले. सातव्या-आठव्या वर्षांपासूनच दत्तात्रेय कीर्तनांना संवादिनीची साथ करू लागले.

ट्रिनिटी क्लब, मुंबई

संगीताचा प्रचार व प्रसार याकरिता कार्यरत असणारे मंडळ. गायनाचार्य भास्करबुवा बखले यांच्या हस्ते ट्रिनिटी क्लबची सुरुवात १९०८ साली मुंबई येथील गिरगाव येथे झाली.  पुढे बालगंधर्व व मास्टर कृष्णराव हे ही या क्लबमध्ये येऊ लागले आणि ‘त्रिमूर्ती संगीत मंडळ’ या नावाने हा क्लब ओळखला जाऊ लागला. त्यावेळी कलाकारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित होता. बाहेर गावाहून कलाकार मुंबईत आले तर त्यांच्या रियाजाची तसेच निवासाची सोय करण्यास योग्य जागा नव्हती. ही गरज ओळखून कलाकारांच्या सोयीसाठी गिरगावातील चाळीतील एक खोली हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या एका चाहत्याने भास्करबुवांना दिली.

संबंधित राग परिचय