Skip to main content

शख्सियत

मल्लिकार्जुन मन्सूर

मन्सूर, मल्लिकार्जुन भीमरायप्पा : (३१ डिसेंबर १९१० – १२ सप्टेंबर १९९२). हिदुस्थानी संगीतातील जयपूर-अत्रौली घराण्याचे श्रेष्ठ गायक. त्यांचा जन्म मन्सूर (कर्नाटक) येथे झाला. मन्सूरांचे आरंभीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य मिरजेचे पं. नीळकंठबुवा यांच्याकडे झाले. पुढे जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाखाँ यांचे पुत्र मंजीखाँ आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे बंधू भूर्जीखाँ यांच्याकडे मन्सूर यांनी पुष्कळ वर्षे तालीम घेतली. विशेषत: मंजीखाँ यांच्या प्रतिभावंत पण बंडखोर गायकीचा मन्सूरांच्या शैलीवर विलक्षण प्रभाव दिसून येतो.

भास्करबुवा बखले

खले, भास्करबुवा रघुनाथ : ( १७ ऑक्टोबर १८६९ – ८ एप्रिल १९२२ ). एक अष्टपैलू, चतुरस्त्र प्रतिभेचे श्रेष्ठ गायक कलावंत; गायनाचार्य व अभिजात नाट्यसंगीताच्या परंपरेचे प्रवर्तक. भास्करबुवांचा जन्म बडोदे संस्थानातील कठोर या गावी झाला. घरची गरिबी असल्याने प्राथमिक शालेय शिक्षण व त्यानंतर संस्कृत पाठशाळेतले शिक्षण त्यांना फार कष्टाने करावे लागले. त्यांचा आवाज लहानपणापासून गोड असल्यामुळे वर्गशिक्षक त्यांना वारंवार संस्कृत श्लोकपठण करायला लावीत. त्यांच्या या गुणांमुळे पिंगळेबुवा नावाच्या हरिदासाकडे त्यांची संगीतशिक्षणाची सोय झाली.

बी. आर. देवधर

देवधर, बाळकृष्ण रामचंद्र : (११ सप्टेंबर १९०१ – १० मार्च १९९०). प्रसिद्ध भारतीय संगीतज्ञ, संगीत शिक्षक व शास्त्रीय गायक आणि आवाज जोपासनशास्त्राचे एक अग्रगण्य अभ्यासक. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात मिरज (भूतपूर्व संस्थान व सांप्रत सांगली जिल्हा) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावीच झाले आणि वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मिरजेमध्ये नीलकंठबुवा अलूरमठ, विनायकबुवा पटवर्धन व अंशत: अब्दुल करीमखाँ यांच्याकडून त्यांनी संगीतशिक्षण घेतले. त्यानंतर ते मुंबईला विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याकडे गांधर्व विद्यालयात पुढील संगीतशिक्षणासाठी गेले (१९१८).

बाळूभाई रूकडीकर

बाळूभाई रूकडीकर : (२८ डिसेंबर १८८८ – २२ ऑक्टोबर १९६२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबलावादक. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे खरे नाव उस्ताद गुलाम हुसेन. लहानपणी वडिलांबरोबर ते पंतअमात्य बावडेकर यांच्याकडे जात असत. ते त्यांना बाळ म्हणत. त्यावरूनच पुढे बाळूभाई हे त्यांचे नाव प्रचलित झाले. शिवाय बळवंतराव या नावानेही ते ओळखले जात. त्यांचे वडील उस्ताद दादाभाई हे त्यावेळचे प्रसिद्ध तबलावादक होते, तर त्यांच्या आई अमिनाबाई ह्या सुप्रसिद्ध गायिका होत्या. त्यामुळे जन्मापासूनच त्यांना कलेचा वारसा लाभला. वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्यांनी वडिलांकडून तबलावादनाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

पुरंदरदास

पुरंदरदास : (सु. १४८४ – सु. १५६४). कर्नाटकातील एक थोर संतकवी, शास्त्रीय संगीतकार व रचनाकार. हे वसिष्ठ गोत्री यजुर्वेदी ब्राह्मण असून माध्वमताचे होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील पुरंदरगडावर झाला, असे म्हणतात. पण काही विद्वानांच्या मते त्यांचा जन्म बळ्ळारी जिल्ह्यातील हंपीजवळील पुरंदरगड या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव वरदप्पा नायक. ते रत्नांचे व्यापारी होते. पुरंदरदासांचे जन्मनाम श्रीनिवास तथा तिम्मप्पा नायक. संस्कृत, कन्नड, संगीत या विषयांत त्यांनी शास्त्रोक्त ज्ञान संपादन केले होते. विजयानगरच्या कृष्णदेवरायांच्या दरबारात ते रत्नपारखी म्हणून प्रसिद्ध होते.

फैय्याज खान

आफताब-ए-मौसिकी उस्ताद फैय्याज खान हे आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गायक होते. ध्रुपद,धमारच नव्हे तर ख्याल,ठुमरी,गझल,दादरा अशा गायनाच्या सर्वच शैलींमध्ये त्यांचे प्रावीण्य निर्विवाद होते.

उस्ताद फैयाज खान (8 फेब्रुवारी 1886 - 5 नोव्हेंबर 1950) हे एक भारतीय शास्त्रीय गायक होते, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या आग्रा घराण्याचे प्रतिपादक होते. स्वर्गंगा म्युझिक फाउंडेशनच्या वेबसाईटनुसार, "बडोदा येथे त्यांचे निधन झाले तोपर्यंत त्यांनी शतकातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायक म्हणून नावलौकिक मिळवला होता.

स्वरमेलकलानिधि

मध्ययुगीन थाट पद्धती सांगणारा आद्य ग्रंथ. दाक्षिणात्य संगीतज्ञ पंडित रामामात्य यांनी १५५० मध्ये हा ग्रंथ लिहिला. पं. रामामात्य हे विजयनगरच्या रामराजाचे आप्त व समकालीन असून रामराजांच्या सांगण्यावरून त्यांनी या ग्रंथाचे लेखन केले. तत्कालीन रागांचे वर्गीकरण करण्यासाठी सांगितलेले ‘मेल’ हे या ग्रंथाचे प्रमुख वैशिष्ट्य होय. यापूर्वीच्या काळातील ग्रंथांमध्ये प्राचीन जातिसंगीताच्या प्रभावातून ग्रह, अंश, न्यासादी रागलक्षणांना महत्त्व देऊन केलेले राग-रागिणी वर्गीकरण आढळते. रागामध्ये येणाऱ्या स्वरांच्या आधारे रागांचे वर्गीकरण करावे, ही कल्पना संगीतरत्नाकर या ग्रंथानंतरच्या कालामध्ये विकसित झाली.

स्वर साधना समिती, मुंबई

भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांच्या जतन-संवर्धनास वाहिलेली आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याकरिता प्रयत्नशील असणारी एक प्रसिद्ध संस्था. तिची स्थापना १९ ऑक्टोबर १९६१ रोजी विजया दशमीच्या मुहूर्तावर मुंबईत सुविख्यात सतार वादक पं. केकी जिजिना आणि जगातील पहिल्या महिला स्वतंत्र तबला वादक आणि संगीत शास्त्रज्ञ आबान मिस्त्री यांनी केली.

सुहासिनी रामराव कोरटकर

कोरटकर, सुहासिनी रामराव : (३० नोव्हेंबर १९४४ – ७ नोव्हेंबर २०१७). भेंडीबाजार घराण्याच्या एक प्रतिभासंपन्न गायिका व संगीत रचनाकार. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय सुशिक्षित अभिरूचीसंपन्न कुटुंबात झाला. वडील रामराव हवाईदलात तंत्रज्ञ होते. त्यांच्या नोकरीतील बदलीमुळे कुटुंबाची अनेक ठिकाणी भ्रमंती झाली. अखेर त्यांनी पुणे येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला (१९५७). त्यामुळे सुहासिनीताईंचे सुरुवातीचे शिक्षण बंगलोर, मुंबई व पुणे येथे झाले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्र विषयातून पदवी घेतली (१९६१).

सुधीर फडके (बाबूजी)

फडके, सुधीर : (२५ जुलै १९१९ – २९ जुलै २००२). प्रसिद्ध मराठी भावगीतगायक आणि चित्रपटक्षेत्रातील निर्माते, संगीतदिग्दर्शक व पार्श्वगायक. त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र ऊर्फ सुधीर विनायकराव फडके. पण बाबूजी या नावाने ते अधिक परिचित होते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. आई सरस्वतीबाई त्यांच्या बालपणीच निवर्तल्या (१९२८). वडील विनायकराव वकील होते. बाबूजींचे शालेय शिक्षण कोल्हापुरात झाले.

संबंधित राग परिचय