अरुण दाते

दाते, अरुण (अरविंद) रामूभैय्या : (४ मे १९३४ – ६ मे २०१८). मराठी भावगीत गायकीला गझलसदृश मुलायम वळण देणारे प्रथितयश गायक. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांचे पणजोबा मूळगाव अडिवरे (जि. रत्नागिरी) येथून शिक्षणासाठी पायी चालत इंदूरला गेले व शिक्षणोत्तर तेथेच दरबारी न्यायालयात काम करू लागले. ते तेथील एक नि:स्पृह न्यायाधीश म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे वडील रामूभैय्या हे शासकीय अधिकारी आणि साहित्याचे व शास्त्रीय संगीताचे जाणकार होते. त्यांच्या आई माणिकबाई या गृहिणी होत्या. या दांपत्यास तीन मुली व दोन मुलगे. अरुण दाते यांचे भाऊ रवी हेही तरबेज तबलावादक होते.

अमीर हुसेनखाँ

अमीर हुसेनखाँ, उस्ताद : (? १८९९ – ५ जानेवारी १९६९). सुप्रसिद्ध भारतीय तबलावादक. त्यांचा जन्म उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ जिल्ह्यातील बनखंडा या गावी झाला. त्यांचे वडील उस्ताद अहमद बक्क्षखाँ यांची उत्तम सारंगीवादक म्हणून ख्याती होती. दक्षिण हैदराबादच्या निजामाकडून ‘दरबारी वादक’ म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. त्यामुळे अमीर यांचे लहानपण हैदराबाद येथेच व्यतीत झाले. तबलावादनाचे प्राथमिक शिक्षण त्यांनी आपल्या वडिलांकडून आत्मसात केले. त्यांना वाचनाचीही आवड होती. उर्दूत भाषांतरित झालेल्या इतिहास व तत्त्वज्ञान या विषयांतील अनेक ग्रंथांचे वाचन त्यांनी केले होते.

अब्दुल करीमखाँ

अब्दुल करीमखाँ : ( ११ नोव्हेंबर १८७२–२७ ऑक्टोबर १९३७ ). किराणा घराण्याचे सुविख्यात गायक. आज किराणा घराणे हे खाँसाहेबांच्या गानशैलीमधील वैशिष्ट्यांवरूनच ओळखण्यात येते. या घराण्याचे मूळ पुरूष नायक धोंडू. खाँसाहेबांचे घराणे हे तंतकारांचे होते. सुविख्यात बीनकार बंदे अलीखाँ हे खाँसाहेबांचे चुलत-चुलते. अब्दुल करीमखाँचे संगीतशिक्षण त्यांचे वडील कालेखाँ आणि चुलते अब्दुल्लाखाँ यांच्याकडे झाले. खाँसाहेब स्वत: गात; तसेच ते सारंगी, सतार, बीन इ. वाद्येही चांगली वाजवीत आणि शिकवीत असत. या वादनामुळे त्यांच्या गायनावर आणि शैलीवर अतिशय मोहक आणि पोषक परिणाम घडून आला.

झंपताल

झपताल हा हिंदुस्थानी संगीताचा ताल आहे. हे टिंटलपेक्षा एक वेगळी लयबद्ध रचना सादर करते, ज्याच्या विपरीत ती सममितीय नाही. हे मध्यालय (मध्यम-टेम्पो) ख्यालमध्ये वापरले जाते.

राग परिचय

हिंदुस्तानी एवं कर्नाटक संगीत

हिन्दुस्तानी संगीत में इस्तेमाल किए गए उपकरणों में सितार, सरोद, सुरबहार, ईसराज, वीणा, तनपुरा, बन्सुरी, शहनाई, सारंगी, वायलिन, संतूर, पखवज और तबला शामिल हैं। आमतौर पर कर्नाटिक संगीत में इस्तेमाल किए जाने वाले उपकरणों में वीना, वीनू, गोत्वादम, हार्मोनियम, मृदंगम, कंजिर, घमत, नादाश्वरम और वायलिन शामिल हैं।

राग परिचय