बी. आर. देवधर

देवधर, बाळकृष्ण रामचंद्र : (११ सप्टेंबर १९०१ – १० मार्च १९९०). प्रसिद्ध भारतीय संगीतज्ञ, संगीत शिक्षक व शास्त्रीय गायक आणि आवाज जोपासनशास्त्राचे एक अग्रगण्य अभ्यासक. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात मिरज (भूतपूर्व संस्थान व सांप्रत सांगली जिल्हा) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावीच झाले आणि वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मिरजेमध्ये नीलकंठबुवा अलूरमठ, विनायकबुवा पटवर्धन व अंशत: अब्दुल करीमखाँ यांच्याकडून त्यांनी संगीतशिक्षण घेतले. त्यानंतर ते मुंबईला विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याकडे गांधर्व विद्यालयात पुढील संगीतशिक्षणासाठी गेले (१९१८).

बाळूभाई रूकडीकर

बाळूभाई रूकडीकर : (२८ डिसेंबर १८८८ – २२ ऑक्टोबर १९६२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबलावादक. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे खरे नाव उस्ताद गुलाम हुसेन. लहानपणी वडिलांबरोबर ते पंतअमात्य बावडेकर यांच्याकडे जात असत. ते त्यांना बाळ म्हणत. त्यावरूनच पुढे बाळूभाई हे त्यांचे नाव प्रचलित झाले. शिवाय बळवंतराव या नावानेही ते ओळखले जात. त्यांचे वडील उस्ताद दादाभाई हे त्यावेळचे प्रसिद्ध तबलावादक होते, तर त्यांच्या आई अमिनाबाई ह्या सुप्रसिद्ध गायिका होत्या. त्यामुळे जन्मापासूनच त्यांना कलेचा वारसा लाभला. वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्यांनी वडिलांकडून तबलावादनाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

बडे गुलाम अलीखाँ

बडे गुलाम अलीखाँ : ( २ एप्रिल १९०२ – २३ एप्रिल १९६८ ). अखिल भारतीय कीर्तीचे पतियाळा घराण्याचे प्रख्यात गायक. त्यांचा जन्म लाहोर, पाकिस्तान येथे झाला. त्यांचे घराणे गायकवादकांचे असून ते मूळ कसूर (जि.लाहोर) गावचे राहणारे होते. पतियाळा घराण्याच्या आकर्षक व विविध अंगानी परिपूर्ण अशा गायकीचा परिचय भारतात सर्वत्र करून देण्यात बडे गुलाम अलीखाँचा वाटा फार मोठा आहे. त्यांचे वडील अलीबक्ष व चुलते कालेखाँ हे दोघेही पतियाळा घराण्याचे प्रसिद्ध गायक फतेह अली यांचे शिष्य. अलीबक्ष गायनही करीत व दिलरूबाही उत्तम तऱ्हेने वाजवीत असत. अलीबक्ष काश्मीरच्या महाराजांच्या दरबारी गायक होते.

पुरंदरदास

पुरंदरदास : (सु. १४८४ – सु. १५६४). कर्नाटकातील एक थोर संतकवी, शास्त्रीय संगीतकार व रचनाकार. हे वसिष्ठ गोत्री यजुर्वेदी ब्राह्मण असून माध्वमताचे होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील पुरंदरगडावर झाला, असे म्हणतात. पण काही विद्वानांच्या मते त्यांचा जन्म बळ्ळारी जिल्ह्यातील हंपीजवळील पुरंदरगड या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव वरदप्पा नायक. ते रत्नांचे व्यापारी होते. पुरंदरदासांचे जन्मनाम श्रीनिवास तथा तिम्मप्पा नायक. संस्कृत, कन्नड, संगीत या विषयांत त्यांनी शास्त्रोक्त ज्ञान संपादन केले होते. विजयानगरच्या कृष्णदेवरायांच्या दरबारात ते रत्नपारखी म्हणून प्रसिद्ध होते.

पुणे भारत गायन समाज

पुणे भारत गायन समाज : हिंदुस्थानी संगीताच्या प्रसार-प्रचारार्थ आणि संगीतप्रशिक्षण यासाठी कार्यरत असलेली एक जुनी संगीतसंस्था. गायनाचार्य भास्करबुवा बखले यांनी जिज्ञासूंना सहज संगीत शिकता यावे या हेतूने दि. १ सप्टेंबर १९११ रोजी या संस्थेची स्थापन केली. किर्लोस्कर संगीत नाटक मंडळींचा या संस्थेस पाठिंबा असल्याने संस्थेचे नामकरण ‘किर्लोस्कर भारत गायन समाज’ असे करण्यात आले. कालांतराने ते ‘भारत गायन समाज’ असे झाले.

राग परिचय

हिंदुस्तानी एवं कर्नाटक संगीत

हिन्दुस्तानी संगीत में इस्तेमाल किए गए उपकरणों में सितार, सरोद, सुरबहार, ईसराज, वीणा, तनपुरा, बन्सुरी, शहनाई, सारंगी, वायलिन, संतूर, पखवज और तबला शामिल हैं। आमतौर पर कर्नाटिक संगीत में इस्तेमाल किए जाने वाले उपकरणों में वीना, वीनू, गोत्वादम, हार्मोनियम, मृदंगम, कंजिर, घमत, नादाश्वरम और वायलिन शामिल हैं।

राग परिचय