सी. आर. व्यास
व्यास, चिंतामण रघुनाथ : (९ नोव्हेंबर १९२४ – १० जानेवारी २००२). प्रसिद्ध हिंदुस्थान शास्त्रीय संगीत गायक व संगीतज्ञ. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात झाला. त्यांचे घराणे संस्कृत विद्वान आणि कीर्तनकारांची परंपरा असलेले होते. त्यांचे सुरुवातीस संगीताचे शिक्षण किराणा घराण्याचे गायक पंडित गोविंदराव भातंब्रेकर यांच्याकडे सुरू झाले. सुमारे बारा वर्षे ही तालीम चालली. वयाच्या एकविसाव्या वर्षी ते मुंबईला आले (१९४५). माटुंगा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करताना ते ग्वाल्हेर घराण्याचे पंडित राजारामबुवा पराडकर यांच्याकडे गायन शिकू लागले.
- Read more about सी. आर. व्यास
- Log in to post comments
- 10 views
सामताप्रसाद
मिश्र, सामताप्रसाद : (२० जुलै १९२०–३१ मे १९९४). प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीतकार व बनारस घराण्याचे तबलावादक. त्यांचा जन्म वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील कबीर चौरा येथे नामांकित तबलावादकांच्या घराण्यात झाला. गुडाई (गुदई) महाराज म्हणूनही ते ओळखले जात. त्यांच्या वडिलांचे नाव हरिसुंदर उर्फ पं. बाचा मिश्र. आजोबा पं. जगन्नाथ मिश्र व पणजोबा पं. प्रताप महाराज हे विख्यात तबलावादक होते. त्यामुळे सामताप्रसाद यांना बालवयापासूनच तबलावादनात स्वारस्य निर्माण झाले होते. तबलावादनाचे प्राथमिक शिक्षण त्यांना वडिलांकडून मिळाले. मात्र सामताप्रसाद सात वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे पं.
- Read more about सामताप्रसाद
- Log in to post comments
- 5 views
सत्रिया नृत्य
भारतातील आसाम राज्याचे शास्त्रीय नृत्य. १५ नोव्हेंबर २००० रोजी संगीत नाटक अकादमीने सत्रिया नृत्याला भारतीय शास्त्रीय नृत्य म्हणून मान्यता दिली.
- Read more about सत्रिया नृत्य
- Log in to post comments
- 7 views
संगीत सार
संगीतरत्नाकर ह्या महत्त्वाच्या संगीतविषयक आधारभूत संस्कृत ग्रंथाचा प्रसिद्ध अनुवाद. याला श्री राधागोविंद संगीत सार असेही म्हणतात. जयपूरचे महाराजा सवाई प्रताप सिंह (राज्यकाल १७७८ – १८०४) हे कलांचे आश्रयदाते राजे म्हणून विख्यात होते. हवामहलची निर्मिती, ब्रजभाषेतील काव्यास दिलेले उत्तेजन, राजस्थानी लघुचित्रशैलीला त्यांनी दिलेला उदार आश्रय व चालना, तसेच स्वत: ‘ब्रजनिधी’ ह्या मुद्रेने केलेल्या काव्यरचना ह्यांवरून त्यांचे कलासक्त व्यक्तित्त्व लक्षात येते. ते संगीताचे मर्मज्ञ आश्रयदाते होते आणि त्यांच्या गुणिजनखान्यात अनेक कलाकार, विद्वान संगीतकार होते.
- Read more about संगीत सार
- Log in to post comments
- 4 views
सी. रामचंद्र (
सी. रामचंद्र : (१२ जानेवारी १९१८— ५ जानेवारी १९८२). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक व पार्श्वगायक. मूळ नाव रामचंद्र नरहर चितळकर. ‘सी. रामचंद्र’ हे संक्षिप्त नाव त्यांनी सिनेदिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरून धारण केले. आपल्या निकटवर्तीयांत ते ‘अण्णा’ म्हणून प्रसिद्ध होते. आर्. एन्. चितळकर, श्यामू, राम चितळकर, सी. रामचंद्र व अण्णासाहेब अशा विविध नावांनी त्यांनी संगीतदिग्दर्शन व पार्श्वगायन केले. त्यांचा जन्म पुणतांब्याचा (जि. अहमदनगर ). पुणतांब्याजवळील चितळी हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस होते.
- Read more about सी. रामचंद्र (
- Log in to post comments
- 13 views
राग परिचय
हिंदुस्तानी एवं कर्नाटक संगीत
हिन्दुस्तानी संगीत में इस्तेमाल किए गए उपकरणों में सितार, सरोद, सुरबहार, ईसराज, वीणा, तनपुरा, बन्सुरी, शहनाई, सारंगी, वायलिन, संतूर, पखवज और तबला शामिल हैं। आमतौर पर कर्नाटिक संगीत में इस्तेमाल किए जाने वाले उपकरणों में वीना, वीनू, गोत्वादम, हार्मोनियम, मृदंगम, कंजिर, घमत, नादाश्वरम और वायलिन शामिल हैं।