Skip to main content

शख्सियत

दिनकर कायकिणी

 कायकिणी, दिनकर  दत्तात्रय : (२ ऑक्टोबर १९२७ – २३ जानेवारी २०१०). हिंदुस्थानी संगीतातील आग्रा घराण्याचे शैलीदार गायक, गुरू, वाग्गेयकार, संगीतज्ज्ञ व आयोजक. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे आई-वडील दोघांनाही गाण्याची आवड होती. त्यांच्या आई कृष्णाबाई (कुटाबाई) या उत्तम भजने गाणा­ऱ्या म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांच्या गाण्याचे संस्कार लहानवयापासून दिनकर यांच्यावर झाले. त्यांनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण पतियाळा घराण्याचे पं. नागेशराव करेकट्टी यांच्याकडे घेतले. त्यानंतर १९३६ पासून पं.ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडून ग्वाल्हेर गायकीची तालीम घ्यायला त्यांनी सुरुवात केली.

दत्तात्रेय विष्णु पलुस्कर

पलुस्कर, डी. व्ही. : (१८ मे १९२१ – २६ ऑक्टोबर, १९५५). महाराष्ट्रातील एक थोर गायक. त्यांचा जन्म गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर व रमाबाई या दांपत्यापोटी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) येथे झाला. विष्णु दिगंबरांना आठ मुली व चार मुलगे अशी बारा अपत्ये झाली. त्यांपैकी दत्तात्रय वगळता सर्व मुले अल्पायुषी होती; या एकुलत्या एक मुलाचा व्रतबंध विधी त्यांनी नाशिकमध्ये मोठ्या धुमधडाक्याने साजरा केला (१९२८). दत्तात्रेयांना बापूराव व डी. व्ही. अशा नावानेही ओळखत असत. त्यांना बालपणापासूनच विष्णु दिगंबरांनी गायनाची तालीम देण्यास सुरुवात केली.

गंगूबाई हनगल

हनगल / हनगळ, गंगूबाई : (५ मार्च १९१३–२१ जुलै २००९). किराणा घराण्याच्या ज्येष्ठ आणि प्रख्यात गायिका. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात त्यांचे नाव ठळकपणे घेतले जाते. त्यांचा जन्म धारवाड (कर्नाटक) येथे झाला. वडिलांचे नाव चिक्कूराव नाडगीर व आईचे नाव अंबाबाई. हे दाम्पत्य संगीतप्रेमी होते. गंगूबाईंच्या आई कर्नाटक शास्त्रीय संगीत गात असत. त्यामुळे बालपणापासून गंगूबाईंवर संगीताचे संस्कार झाले. बालपणीच्या काही काळात त्यांनी धारवाड येथे प्रतापलाल व श्यामलाल यांच्याकडे कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले; परंतु गायनशिक्षण हाच त्यांचा ध्यास राहिला.

खाप्रूमामा पर्वतकर

पर्वतकर, खाप्रूमामा : (? १८८०–३ सप्टेंबर १९५३). प्रख्यात तबलावादक. खाप्रूमामा (खाप्रूजी) उर्फ लक्ष्मणराव पर्वतकर यांचा जन्म गोव्यामधील पर्वती या गावी संगीतकलेचा पिढीजाद वारसा लाभलेल्या घराण्यात झाला. त्यांचे मामा रधुवीर यांच्याकडे सारंगीवादन व चुलते हरिश्चंद्र यांच्याकडे ते तबलावादन शिकले. एक धृपदीये अनंतबुवा धवळीकर यांच्याकडे त्यांनी धृपद-धमाराची तालीम घेतली. सुरुवातीस त्यांनी तबल्यावर व सारंगीवर अनेक प्रसिद्ध गायक-गयिकांची साथ केली.

खादीम हुसेन खाँ

खाँ, खादीम हुसेन : (१९०७ – ११ जानेवारी १९९३). हिंदुस्थानी संगीतातील अत्रौली घराण्यातील एक अध्वर्यू आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व, संगीतज्ञ व गायक. त्यांच्या जन्मतारखेचा तपशील उपलब्ध नाही. उत्तर प्रदेशातील अलीगढजवळील अत्रौली या गावात संगीतकारांच्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अल्ताफ हुसैन खाँ हे जयपूर दरबारचे संगीतकार होते. त्यामुळे खाँसाहेबांचे बालपण जयपूर येथे गेले.

क्लॅव्हिकॉर्ड

एक पश्चिमी तंतुवाद्य. सुमारे पंधराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत आणि पुन्हा विसाव्या शतकात वापरात आलेले हे वाद्य आहे. याची उत्क्रांती मानोकॉर्डपासून झाली. १४०४ मध्ये या वाद्यनामाचा पहिल्यांदा वापर झाला. हळूहळू सप्तकांच्या मर्यादा वाढत गेल्या. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून हे वाद्य आविष्काराच्या दृष्टीने मान्यता पावले.

कृष्णराव गुंडोपंत गिंडे (के. जी.)

गिंडे, कृष्णराव गुंडोपंत (के. जी.) : (२६ डिसेंबर १९२५ – १३ जुलै १९९४). भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रातील भातखंडे परंपरेतील एक निष्ठावंत गायक, संगीतज्ञ व संगीत रचनाकार. ते ‘सुजनसुत’ म्हणूनही परिचित होते. त्यांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात बैलहोंगळ या गावी एका मध्यमवर्गीय संगीत व नाटक प्रेमी कुटुंबात झाला. गिंडे कुटुंबातील हे आठवे अपत्य. त्यांच्या आईचे नाव राधाबाई. कृष्णरावांचे वडील गुंडोपंत यांनी शिष्यवृत्तीवर शालेय शिक्षण बेळगावात पूर्ण करून एल.सी.पी.एस. ही वैद्यकशास्त्रातील पदवी घेतली होती.

कुंदनलाल सैगल

सैगल, कुंदनलाल : (४ / ११ एप्रिल १९०४–१८ जानेवारी १९४७). अखिल भारतीय कीर्तीचे थोर गायक आणि चित्रपट अभिनेते. त्यांचा जन्म जम्मू येथे एका मध्यमवर्गीय सुशिक्षित पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. या दांपत्याच्या चार मुलांपैकी कुंदनलाल हे तिसरे अपत्य होय. त्यांच्या बालपणी त्यांची आई त्यांना धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन यांसारख्या पारंपरिक शैलीत गायल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयातच कुंदनलाल यांच्यावर झाले.

किशन महाराज

पंडित किशन महाराज : (३ सप्टेंबर १९२३ – ४ मे २००८). बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक. त्यांचा जन्म वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील कबीरचौरा येथे एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. त्यांचे वडील पं. हरी महाराज यांच्याकडे त्यांनी बालवयापासून तबलावादनाचे शिक्षण घेतले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी त्यांचे चुलते पं. बलदेव सहाय यांचे शिष्य व बनारसचे श्रेष्ठ वादक पं. कंठे महाराज यांच्याकडून तबल्याची तालीम घेतली.

कल्याण गायन समाज

कल्याण (ठाणे जिल्हा) येथील संगीताच्या प्रचार-प्रसार व संवर्धनार्थ कार्यरत असलेली एक नामवंत संस्था. तिची स्थापना दिनकर रघुनाथ तथा काकासाहेब बर्वे आणि त्यांच्या संगीतप्रेमी सहकाऱ्यांनी १० जुलै १९२६ रोजी देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांच्या स्मरणार्थ केली. संगीत शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच संगीताची अभिरुची वाढावी, या उद्देशाने तिची सुरुवात झाली. या क्षेत्रात गेली नऊ दशके ही संस्था अव्याहतपणे कार्यरत आहे.

संबंधित राग परिचय