Skip to main content

शख्सियत

एम. एस. सुब्बुलक्ष्मी

सुब्बुलक्ष्मी, एम. एस. : (१६ सप्टेंबर १९१६ – ११ डिसेंबर २००४). कर्नाटक संगीतशैलीतील श्रेष्ठ भारतीय गायिका व  सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी. त्यांचे पूर्ण नाव मदुराई षण्मुखवाडिवु सुब्बुलक्ष्मी असे आहे. पुढे त्या ‘एम. एस. सुब्बुलक्ष्मी’ ह्या नावाने संगीतक्षेत्रात ख्यातनाम झाल्या. त्यांचा जन्म मदुराई येथे झाला. त्यांना लहानपणी कुंजम्मा म्हणत. त्यांच्या आई षण्मुखवाडिवु या नामवंत वीणावादक होत्या, तर त्यांच्या आजी अक्कमल या व्हायोलिनवादक होत्या. या दोघींच्या संगीताचा वारसा सुब्बुलक्ष्मी यांना लाभला.

एम. एल. वसंतकुमारी

वसंतकुमारी, एम. एल. : (३ जुलै १९२८ – ३१ ऑक्टोबर १९९०). कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका व संगीतकार आणि ख्यातकीर्त चित्रपटगीत गायिका. त्यांचे पूर्ण नाव मद्रास ललितांगी वसंतकुमारी. त्या ‘एमएलव्ही’ या नावानेही लोकप्रिय आहेत. पुरुषप्रधान गायन संस्कृतीमध्ये त्यावेळी एम. एल. वसंतकुमारी आणि त्यांच्या समकालीन डी. के. पट्टम्मल, एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना कर्नाटक संगीतातील महिला त्रिमूर्ती म्हणून गौरविण्यात आले होते.

अशोक दामोदर रानडे

रानडे, अशोक दामोदर : (२५ नोव्हेंबर १९३७ – ३० जुलै २०११). भारतातील संस्कृती-संगीतशास्त्राचे अध्वर्यू, संगीतशास्त्रज्ञ-रचनाकार, गायक व गुरू म्हणून विख्यात. संगीतविचाराच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मौलिक व व्यापक असे आहे. त्यांचा जन्म दामोदर व काशीबाई या सुशिक्षित-संगीतप्रेमी दांपत्यापोटी पुणे येथे झाला. ते दोन वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. पुढे ते पुण्याहून मुंबईस आले. त्यांचे शालेय शिक्षण आर्यन हायस्कूल येथे झाल्यावर त्यांनी एल्एल्. बी. (१९६०, मुंबई विद्यापीठ), एम.ए. मराठी व इंग्रजी (१९६२ व १९६४, विल्सन कॉलेज) या पदव्या प्राप्त केल्या.

अरुण दाते

दाते, अरुण (अरविंद) रामूभैय्या : (४ मे १९३४ – ६ मे २०१८). मराठी भावगीत गायकीला गझलसदृश मुलायम वळण देणारे प्रथितयश गायक. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांचे पणजोबा मूळगाव अडिवरे (जि. रत्नागिरी) येथून शिक्षणासाठी पायी चालत इंदूरला गेले व शिक्षणोत्तर तेथेच दरबारी न्यायालयात काम करू लागले. ते तेथील एक नि:स्पृह न्यायाधीश म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे वडील रामूभैय्या हे शासकीय अधिकारी आणि साहित्याचे व शास्त्रीय संगीताचे जाणकार होते. त्यांच्या आई माणिकबाई या गृहिणी होत्या. या दांपत्यास तीन मुली व दोन मुलगे. अरुण दाते यांचे भाऊ रवी हेही तरबेज तबलावादक होते.

अमीर हुसेनखाँ

अमीर हुसेनखाँ, उस्ताद : (? १८९९ – ५ जानेवारी १९६९). सुप्रसिद्ध भारतीय तबलावादक. त्यांचा जन्म उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ जिल्ह्यातील बनखंडा या गावी झाला. त्यांचे वडील उस्ताद अहमद बक्क्षखाँ यांची उत्तम सारंगीवादक म्हणून ख्याती होती. दक्षिण हैदराबादच्या निजामाकडून ‘दरबारी वादक’ म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. त्यामुळे अमीर यांचे लहानपण हैदराबाद येथेच व्यतीत झाले. तबलावादनाचे प्राथमिक शिक्षण त्यांनी आपल्या वडिलांकडून आत्मसात केले. त्यांना वाचनाचीही आवड होती. उर्दूत भाषांतरित झालेल्या इतिहास व तत्त्वज्ञान या विषयांतील अनेक ग्रंथांचे वाचन त्यांनी केले होते.

अब्दुल करीमखाँ

अब्दुल करीमखाँ : ( ११ नोव्हेंबर १८७२–२७ ऑक्टोबर १९३७ ). किराणा घराण्याचे सुविख्यात गायक. आज किराणा घराणे हे खाँसाहेबांच्या गानशैलीमधील वैशिष्ट्यांवरूनच ओळखण्यात येते. या घराण्याचे मूळ पुरूष नायक धोंडू. खाँसाहेबांचे घराणे हे तंतकारांचे होते. सुविख्यात बीनकार बंदे अलीखाँ हे खाँसाहेबांचे चुलत-चुलते. अब्दुल करीमखाँचे संगीतशिक्षण त्यांचे वडील कालेखाँ आणि चुलते अब्दुल्लाखाँ यांच्याकडे झाले. खाँसाहेब स्वत: गात; तसेच ते सारंगी, सतार, बीन इ. वाद्येही चांगली वाजवीत आणि शिकवीत असत. या वादनामुळे त्यांच्या गायनावर आणि शैलीवर अतिशय मोहक आणि पोषक परिणाम घडून आला.

सितार मास्टर उस्ताद बाले खान

उस्ताद बाले खान (२ August ऑगस्ट १ 2 2२ - २ डिसेंबर २००)) हे भारतातील सर्वोत्कृष्ट सिटारिस्ट म्हणून व्यापकपणे प्रशंसित आहे. तो संगीत कुटुंबातील एक कुटुंब आहे. त्याचे आजी वडील रहिमत खान हे केवळ त्याचे संगीतच नव्हे तर सितारातील तारांचे काल्पनिक आणि निश्चित पुनर्रचना म्हणून आदरणीय आहेत. सितार रत्न रहिमत खान हे उस्ताद बांदे अली खान यांचे एक मोठे शिष्य होते आणि बाले खान पुढे चालवण्याची ही परंपरा आहे.

शौनक अभिषेकी

शौनक अभिषेकी हिंदुस्तानी शास्त्रीय गायक आणि संगीतकार आहेत. दिवंगत शास्त्रीय गायक पं जितेंद्र अभिषेकी यांचे शौनक हे पुत्र आहेत. लता मंगेशकर या त्यांच्या चुलत आत्या होत. शौनक अभिषेकी म्हणतात, "संगीतातल्या साक्षात सरस्वती म्हणजे लतादिदी. जन्मोजन्मी रीयाज केल्यावर जो सूर मिळतो तो दिदींना नैसर्गिकरीत्या मिळालाय. आम्ही प्रचंड रियाज आणि साधना करून जे मिळवायचा प्रयत्‍न करतो ती देणगी दिदींच्या ठायी निसर्गदत्तच आहे. साधना करणार्‍या प्रत्येकाने त्यांच्या सुरांमधल्या भावांचा अभ्यास करावा.

चंद्र वीणा उस्ताद श्री बाला चंदर

बाला चंदरचा जन्म शैक्षणिक आणि संगीतप्रेमींच्या कुटुंबात झाला. दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीताच्या सुरुवातीच्या प्रशिक्षणासह पारंपारिक लोक संगीत, मंदिरातील गाणे आणि उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रदर्शनासह भारतीय संस्कृतीत व्यापक दृष्टीकोन प्राप्त झाला. शैक्षणिकदृष्ट्या, त्याने सेंट झेव्हियर्स ’कॉलेज, मुंबई येथून भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि एनसीएसटी, मुंबई येथून संगणक विज्ञान विषयातील पदविका पूर्ण केला.

पंडित संगमेश्वर गुरव

पंडित संगमेश्वर गुरव (7 डिसेंबर 1931 - 7 मे 2014) हे किरण घराण्याचे प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायन होते. २००१ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय वोकलिस्ट पं. यांचे वडील आहेत. कैवल्यकुमार गुरव.

संबंधित राग परिचय