Skip to main content

शख्सियत

शोभा गुर्टू (

गुर्टू, शोभा विश्वनाथ : (८ फेब्रुवारी १९२५ – २७  सप्टेंबर २००४). हिंदुस्थानी संगीतातील एक प्रसिद्ध ठुमरी गायिका. त्या मूळच्या गोव्याच्या. विवाहापूर्वीचे नाव भानुमती शिरोडकर. त्यांचा जन्म शिरोडकर या सांगीतिक परंपरा असणाऱ्या घराण्यात बेळगाव (कर्नाटक) येथे झाला. आई मेनकाबाई शिरोडकर या नृत्य व गायन करीत. त्या उ. भूर्जीखाँ यांच्याकडून जयपूर-अत्रौली घराण्याचे संगीत शिकत. शिवाय त्या ठुमरी गाणाऱ्या कलाकारही होत्या, त्यामुळे भानुमतींना लहानपणापासून आईकडून गाण्याचे बाळकडू मिळाले.

शारदा संगीत विद्यालय

संगीतशास्त्राचे शिक्षण देणारी मुंबईतील एक ख्यातनाम संस्था (विद्यालय). या संस्थेच्या संस्थापिका इंदिराबाई केळकर यांचा जन्म कुरुंदवाड (जि. सांगली) येथे झाला. त्या बालकीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी मुंबईत येऊन १९२७ मध्ये राहत्या जागेत गायन-वादनाचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांचे संगीतशिक्षण गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर यांचेकडे सुरू होते. इंदिराबाईंच्या गायन वर्गास वाढता प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी १९३० मध्ये शारदा संगीत विद्यालयाची बांद्रा, मुंबई येथे स्थापना केली व त्याचे उद्घाटन प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांच्या हस्ते केले.

वसंत देसाई

देसाई, वसंत कृष्णाजी : (? जून १९१२ – २२ डिसेंबर १९७५). भारतीय कीर्तीचे सुप्रसिद्ध संगीतदिग्दर्शक. त्यांचा जन्म सोनवडे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे झाला. त्यांचे वडील कृष्णाजी व आई मुक्ताबाई. मुक्ताबाई या आबा भास्कर परुळेकर या प्रसिद्ध कीर्तनकारांच्या कन्या. त्यामुळे लहानपणापासून वसंत यांच्या कानावर भजन, कीर्तन, दशावतारी संगीत आले व त्याची गोडीही लागली. त्यांचे शालेय शिक्षण गावीच झाले. सर्कशीत जावे असे त्यांना लहानपणी वाटत होते, म्हणून ते कोकणातून कोल्हापुरास त्यांचे काका नरहरी यांच्याकडे आले (१९२९) परंतु सर्कशीत न जाता प्रभात फिल्म कंपनीत गेले. मूकपटांतून किरकोळ भूमिकाही त्यांनी केल्या.

रागविचार : इतिहास व स्वरूप

भारतीय संगीतामध्ये रागसंकल्पना ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संकल्पनेमुळेच भारतीय संगीत इतर संगीतापासून वेगळे प्रतीत होते. रागसंकल्पना व्यापक अर्थाने रागविचारात सामावलेली आहे. या रागसंकल्पनेचे स्वरूप जाणण्याकरिता रागांचा ऐतिहासिक दृष्ट्या विचार करणे उचित ठरेल. रागांचे मूळ बीजरूप मानल्या गेलेल्या ‘जाति’ यांचा उल्लेख भरतप्रणीत नाट्यशास्त्राच्या काळात आढळतो. त्यापुढे याष्टिक, नारद वगैरेंच्या काळात त्यांतूनच ग्रामरागांची कल्पना विकसित झाली आणि मतंगांच्या काळात म्हणजे इ. स. सातव्या शतकात रागसंकल्पनेचे स्वरूप स्पष्ट केले गेले.

येहूदी मेन्युइन

एखाद्या विशिष्ट स्वरसमूहाला बीजरूप मानून स्वरांच्या विविध वर्णक्रियांनी त्या बीजाला फुलवायचे ही रागनिर्मितीची एक प्रक्रिया; तर विविध थाट-रचनांमधून रागाला आवश्यक लक्षणांचा उपयोग करून रागनिर्मिती साधायची ही दुसरी प्रक्रिया. या दोन प्रक्रियांच्या साहाय्याने जवळजवळ १,३०० वर्षे भारतामध्ये विविध रागनिर्मिती होण्याची क्रिया चालू आहे. मतंगांच्या पूर्वीच्या काळात रागरचना अस्तित्वात होती हा मुद्दा जरी विवाद्य मानला, तरी मतंगांच्या काळापासून म्हणजे सु. सातव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंत ही रागनिर्मिती होतच आहे.

मुश्ताक हुसेन खाँ

खाँ, मुश्ताक हुसेन : (१८७८ – १९६४). भारतातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रामपूर – सहस्वान या घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यामधील सहस्वान या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या कुटुंबामध्ये पारंपरिक संगीताचे वातावरण होते. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांचे वडील उस्ताद कल्लन खाँ यांच्याकडे त्यांच्या संगीताच्या प्रारंभिक शिक्षणाची सुरुवात झाली. त्यांनी त्यांचे आजोबा उस्ताद हैदर खाँ यांच्याकडूनही संगीताचे शिक्षण घेतले.

बडे गुलाम अलीखाँ

बडे गुलाम अलीखाँ : ( २ एप्रिल १९०२ – २३ एप्रिल १९६८ ). अखिल भारतीय कीर्तीचे पतियाळा घराण्याचे प्रख्यात गायक. त्यांचा जन्म लाहोर, पाकिस्तान येथे झाला. त्यांचे घराणे गायकवादकांचे असून ते मूळ कसूर (जि.लाहोर) गावचे राहणारे होते. पतियाळा घराण्याच्या आकर्षक व विविध अंगानी परिपूर्ण अशा गायकीचा परिचय भारतात सर्वत्र करून देण्यात बडे गुलाम अलीखाँचा वाटा फार मोठा आहे. त्यांचे वडील अलीबक्ष व चुलते कालेखाँ हे दोघेही पतियाळा घराण्याचे प्रसिद्ध गायक फतेह अली यांचे शिष्य. अलीबक्ष गायनही करीत व दिलरूबाही उत्तम तऱ्हेने वाजवीत असत. अलीबक्ष काश्मीरच्या महाराजांच्या दरबारी गायक होते.

पुणे भारत गायन समाज

पुणे भारत गायन समाज : हिंदुस्थानी संगीताच्या प्रसार-प्रचारार्थ आणि संगीतप्रशिक्षण यासाठी कार्यरत असलेली एक जुनी संगीतसंस्था. गायनाचार्य भास्करबुवा बखले यांनी जिज्ञासूंना सहज संगीत शिकता यावे या हेतूने दि. १ सप्टेंबर १९११ रोजी या संस्थेची स्थापन केली. किर्लोस्कर संगीत नाटक मंडळींचा या संस्थेस पाठिंबा असल्याने संस्थेचे नामकरण ‘किर्लोस्कर भारत गायन समाज’ असे करण्यात आले. कालांतराने ते ‘भारत गायन समाज’ असे झाले.

पन्नालाल घोष

घोष, पन्नालाल : (२४ जुलै १९११—२० एप्रिल १९६०). प्रख्यात बासरीवादक. त्यांचा जन्म बारिसाल (बांगला देश) येथे झाला. त्यांचे वडील अक्षयकुमार घोष हे उत्तम सतारिये होते. वयाच्या चौदाव्या वर्षीच पन्नालाल बासरीकडे आकृष्ट झाले. पुढे १९३४ मध्ये त्यांनी मास्टर खुशी महम्मद या संगीतकारांचे शिष्यत्व पतकरले. ‘सराईकेला नृत्यमंडळी’त ते काही काळ संगीत दिग्दर्शक होते. तीबरोबरच १९३८ मध्ये त्यांना यूरोपचा प्रवास घडला. गिरिजा शंकर चक्रवर्ती ह्यांच्याकडे १९३९ मध्ये आणि पुढे १९४७ च्या सुमारास उस्ताद अल्लाउद्दीनखाँ ह्यांच्याकडे त्यांनी संगीताचे अधिक शिक्षण घेतले.

दिनकर कायकिणी

 कायकिणी, दिनकर  दत्तात्रय : (२ ऑक्टोबर १९२७ – २३ जानेवारी २०१०). हिंदुस्थानी संगीतातील आग्रा घराण्याचे शैलीदार गायक, गुरू, वाग्गेयकार, संगीतज्ज्ञ व आयोजक. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे आई-वडील दोघांनाही गाण्याची आवड होती. त्यांच्या आई कृष्णाबाई (कुटाबाई) या उत्तम भजने गाणा­ऱ्या म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांच्या गाण्याचे संस्कार लहानवयापासून दिनकर यांच्यावर झाले. त्यांनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण पतियाळा घराण्याचे पं. नागेशराव करेकट्टी यांच्याकडे घेतले. त्यानंतर १९३६ पासून पं.ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडून ग्वाल्हेर गायकीची तालीम घ्यायला त्यांनी सुरुवात केली.

संबंधित राग परिचय