माणिक वर्मा
वर्मा, माणिक : (१६ मे १९२६ – १० नोव्हेंबर १९९६). सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व सुगमसंगीत गायिका. त्यांचा जन्म पुणे येथे हिराबाई व बळवंत दादरकर या दांपत्यापोटी झाला. त्यांच्या मातोश्री हिराबाई या संगीताच्या उत्तम जाणकार व कलावंत होत्या. त्यांना दत्तूबुवा बागलकोटकर, बापूराव केतकर, बशीर खाँ यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. आपल्या मुलीने सुविद्य गायिका व्हावे असा त्यांचा पहिल्यापासूनचा आग्रह.
- Read more about माणिक वर्मा
- Log in to post comments
- 23 views
मतंग (मतंगमुनी)
मतंग (मतंगमुनी) : एक मध्ययुगीन संगीतरचनाकार आणि आधुनिक रागमालेचे जनक. त्यांच्या जन्म, मृत्यू व जीवनाच्या काळाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही; तथापि दामोदरगुप्ताच्या कुट्टनीमत (इ. स. नववे शतक) आणि अभिनवगुप्त (इ. स. ९५०–१०२०) यांच्या साहित्यात मतंगांच्या संस्कृत भाषेत लिहिलेल्या बृहद्देशी या ग्रंथातील काही उतारे उद्धृत केले आहेत. त्यावरून मतंगांचा काळ इ. स. आठवे शतक मानला जातो. तसेच मतंगांनी बृहद्देशी या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे,
‘‘रागमार्गस्य यद् रूपं यन्नोक्तं भरतादिभि: l निरूप्यते तद्स्माभिर्लक्ष्यलक्षण सयुतम्ll’’
- Read more about मतंग (मतंगमुनी)
- Log in to post comments
- 16 views
भूर्जीखाँ
भूर्जीखाँ : (ॽ १८९० – ५ मे १९५०). जयपूर-अत्रौली घराण्याची गायन परंपरा संक्रमित करणारे एक थोर गायक. त्यांचे पूर्ण नाव शमशुद्दिन गुलाम अहमद ऊर्फ भूर्जीखाँ असून त्यांचा जन्म बुंदी (राजस्थान) येथे झाला. संगीतसम्राट उस्ताद अल्लादियाखाँ यांच्या नसिरुद्दीन (बडेजी), बद्रुद्दीन (मंजीखाँ) व शमशुद्दीन या तीन पुत्रांपैकी हे कनिष्ठ चिरंजीव. भूर्जीखाँ यांना तेजस्वी बुद्धिमत्तेबरोबरच निसर्गदत्त मधुर व पल्लेदार आवाजाची देणगी लाभली होती. त्यांच्या ज्येष्ठ बंधुद्वयांना अल्लादियाखाँची मिळत असलेली तालीम ऐकल्यामुळे विविध रागांतील अनेक बंदिशींचे तसेच अनेक रागांचे संस्कार त्यांच्यावर आपापत: झाले.
- Read more about भूर्जीखाँ
- Log in to post comments
- 8 views
भीमसेन जोशी
जोशी, भीमसेन : (४ फेब्रुवारी १९२२ – २५ जानेवारी २०११). महाराष्ट्रातील एक ख्यातकीर्त गायक व संगीतरचनाकार. त्यांचे पूर्ण नाव भीमसेन गुरुराज जोशी. त्यांचा जन्म गुरुराज व रमाबाई या दांपत्यापोटी धारवाड जिल्ह्यातील रोण या त्यांच्या मावशीच्या गावी झाला. त्यांचे मूळ गाव गदगजवळचे होंबळ असून आजोबा भीमाचार्य हे गदगमध्ये स्थायिक झाले होते. ते कीर्तनकार-गायक होते. भीमसेन यांची आईही सुमधुर भजने म्हणत असे, तर वडील गुरुराज हे शिक्षक असून वेदान्तपारंगत होते. त्यांचे घराणे वंशपरंपरागत ज्योतिषी होते.
- Read more about भीमसेन जोशी
- Log in to post comments
- 46 views
बृहद्देशी
संगीतशास्त्रकार मतंग यांनी इ. स.चे सातवे ते आठवे शतक यांदरम्यान संगीतशास्त्रावर लिहिलेला एक संस्कृत ग्रंथ. प्राचीन सामगायन व जातीगायन हे गंभीर, नियमबद्ध संगीत लोप पावत चालले असताना व रंजकतेला प्राधान्य देणारे संगीत उदयाला येत असतानाच्या काळात होत असलेली सांगीतिक परिवर्तने या ग्रंथात आढळतात. बृहद् म्हणजे व्यापक. देशी संगीताचे व्यापक स्वरूपात विवरण केले आहे, म्हणून या ग्रंथास बृहद्देशी हे नाव सार्थ वाटते.
- Read more about बृहद्देशी
- Log in to post comments
- 55 views
राग परिचय
हिंदुस्तानी एवं कर्नाटक संगीत
हिन्दुस्तानी संगीत में इस्तेमाल किए गए उपकरणों में सितार, सरोद, सुरबहार, ईसराज, वीणा, तनपुरा, बन्सुरी, शहनाई, सारंगी, वायलिन, संतूर, पखवज और तबला शामिल हैं। आमतौर पर कर्नाटिक संगीत में इस्तेमाल किए जाने वाले उपकरणों में वीना, वीनू, गोत्वादम, हार्मोनियम, मृदंगम, कंजिर, घमत, नादाश्वरम और वायलिन शामिल हैं।