दत्तात्रेय विष्णु काणे (काणेबुवा)

काणे, दत्तात्रेय विष्णु : ( २३ फेब्रुवारी १९१९ – १२ ऑक्टोबर १९९७). हिंदुस्थानी संगीतातील एक ख्यातकीर्त गायक. त्यांचा जन्म इचलकरंजी (भूतपूर्व इचलकरंजी संस्थान, कोल्हापूर ) येथे एका सांगीतिक परंपरा असणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील विष्णुपंत हे संवादिनी, तबला आणि सतार ही वाद्ये वाजवीत असत आणि प्रसंगोपात्त कलाकारांना हार्मोनियमची साथही करत असत. इचलकरंजी संस्थानच्या दरबारात ते संवादिनीवादक म्हणून काम करत होते. त्यामुळे दत्तात्रेयांचे प्राथमिक शिक्षण वडिलांकडेच झाले. सातव्या-आठव्या वर्षांपासूनच दत्तात्रेय कीर्तनांना संवादिनीची साथ करू लागले.

ट्रिनिटी क्लब, मुंबई

संगीताचा प्रचार व प्रसार याकरिता कार्यरत असणारे मंडळ. गायनाचार्य भास्करबुवा बखले यांच्या हस्ते ट्रिनिटी क्लबची सुरुवात १९०८ साली मुंबई येथील गिरगाव येथे झाली.  पुढे बालगंधर्व व मास्टर कृष्णराव हे ही या क्लबमध्ये येऊ लागले आणि ‘त्रिमूर्ती संगीत मंडळ’ या नावाने हा क्लब ओळखला जाऊ लागला. त्यावेळी कलाकारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित होता. बाहेर गावाहून कलाकार मुंबईत आले तर त्यांच्या रियाजाची तसेच निवासाची सोय करण्यास योग्य जागा नव्हती. ही गरज ओळखून कलाकारांच्या सोयीसाठी गिरगावातील चाळीतील एक खोली हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या एका चाहत्याने भास्करबुवांना दिली.

जितेंद्र अभिषेकी

अभिषेकी, जितेंद्र : (२१ सप्टेंबर १९२९ / १९३२ ॽ – ७ नोव्हेंबर १९९८). एक चतुरस्त्र गायक, संगीतकार व संगीतज्ञ. त्यांचे मूळ नाव गणेश व आडनाव नवाथे; पण मंगेशी देवस्थानातील पूजा व अभिषेक सांगणारे भिकाजी तथा बाळुबुवा यांचे पुत्र म्हणून आडनाव अभिषेकी झाले.

चतुर्दण्डिप्रकाशिका

सतराव्या शतकातील संगीतशास्त्रावरील एक प्रसिद्ध ग्रंथ. संगीतकार गोविंद दीक्षितांचा द्वितीय पुत्र पंडित व्यंकटमखी यांनी तो लिहिला असून ते उच्च कोटीचे गायक, वीणावादक, रचनाकार, शास्त्रकार, गणितज्ञ, तत्त्वज्ञ व राजनीतिज्ञ होते. कर्नाटकात ते व्यंकटश्वरी आणि व्यकंटेश्वर दीक्षित या नावांनीही परिचित होते. व्यंकटमखी तंजावरचे नायक राजा अच्युत विजयराघव (कार. १६६०–१६७३) यांच्या दरबारात होते. त्यांच्या प्रोत्साहनाने व्यकंटमखींनी चतुर्दण्डिप्रकाशिका  हा ग्रंथ लिहिला. त्यांनी स्थाय, आलाप, गीत व प्रबंध या चार स्तंभावर संगीताचे विश्व उभे केले, त्यावर या ग्रंथात प्रकाश टाकण्यात आला आहे.

गायन समाज देवल क्लब

अभिजात हिंदुस्थानी संगीत, नृत्य व नाट्य यांचे प्रशिक्षण देणारी व सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करणारी कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील विख्यात संगीतसंस्था. सुरुवातीस केवळ गाण्यावरील प्रेमापोटी विश्वनाथराव गोखले, त्र्यंबकराव दातार, गोविंदराव देवल, नातू फौजदार, भाऊसाहेब लिमये यांच्या पुढाकाराने १८८३ मध्ये  ‘करवीर गायन समाज’ या संस्थेची स्थापना झाली. कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजमधील दोन खोल्या मासिक वर्गणी चार आणे भाड्याने घेऊन या संस्थेचा प्रपंच सुरू झाला. केशवबुवा गोगटे, पखवाजी शिवरामबुवा शाळिग्राम, आप्पयाबुवा, बाळूबुवा गुळवणी, भाऊसाहेब कागवाडकर हे नियमितपणे येथे गान सेवा करीत.

राग परिचय

हिंदुस्तानी एवं कर्नाटक संगीत

हिन्दुस्तानी संगीत में इस्तेमाल किए गए उपकरणों में सितार, सरोद, सुरबहार, ईसराज, वीणा, तनपुरा, बन्सुरी, शहनाई, सारंगी, वायलिन, संतूर, पखवज और तबला शामिल हैं। आमतौर पर कर्नाटिक संगीत में इस्तेमाल किए जाने वाले उपकरणों में वीना, वीनू, गोत्वादम, हार्मोनियम, मृदंगम, कंजिर, घमत, नादाश्वरम और वायलिन शामिल हैं।

राग परिचय