होरी

उत्तर हिंदुस्थानी संगीतप्रकारातील एक शृंगार रसप्रधान गायन-प्रकार. याचा विषय प्रामुख्याने कृष्णाच्या रासलीला आणि राधा व गोपिकांच्या संगतीने रंगणारी होळी हा असतो. यातील वर्णन सहसा ब्रज भाषेतच असते. पूर्वी होरी धृपद गायक कलाकारच सादर करीत असत. धृपदाप्रमाणेच हा गायन प्रकार भारदस्त आणि बोजदार असे. हा गायनप्रकार धमार तालात गायला जाई, त्यामुळे धमार या प्रकाराला ‘पक्की होरी’ असेही म्हटले जाई. ख्याल गायनाप्रमाणे यात ताना घेतल्या जात नाहीत. बोलबनाव, दुगुण, तिगुन, गमक, बोलतान आदीने हा प्रकार खुलवत नेत असत. अलीकडे या गायनासाठी दीपचंदी तालदेखील उपयोगात आणला जाऊ लागला आहे.

स्वाती तिरूनल

स्वाती तिरूनल : (१६ एप्रिल १८१३ — २७ डिसेंबर १८४६). कुलशेखर वंशातील त्रावणकोर संस्थानचा एक कलाभिज्ञ, संगीतप्रेमी कर्तबगार राजा. पूर्ण नाव स्वाती तिरूनल रामवर्मा. त्यांचा जन्म राजा रामवर्मा कोईल थम्पुरण आणि महाराणी गौरी लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला. त्यांच्या मोठ्या बहिणीचे नाव रुमिणीबाई. त्यांचे धाकटे भाऊ उथरम तिरूनल मार्तंडवर्मा होत. तिरूनल दोन वर्षांचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मावशी गौरी पार्वतीबाई यांनी राज्यकारभार हाती घेतला आणि राजपुत्रांचे संगोपन केले. तिरूनल यांचे वडील संस्कृत पंडित होते.

स्वरजति

स्वरजती सादरीकरणाची सुरुवात वर्णम् या शास्त्रोक्त गान प्रकाराने होते. वर्णम् म्हणजे ठराविक स्वरात बांधलेला छोटासा तुकडा. यासाठी मुख्यत्वे आदिताल किंवा अट्टताल या तालांची निवड करतात. वर्णम् मधील शब्द छोटे आणि सुटसुटीत असतात आणि ते काहीशा दीर्घ स्वराकृतीत असे बसविलेले असतात, की ज्यातून रागस्वरूप स्पष्ट व्हावे. वर्णम् नंतर पल्लवी आणि अनुपल्लवी सादर केली जाते. ‘पल्लवी’ रागाचे पूर्वांग स्थापित करते, तर ‘अनुपल्लवी’ उत्तरांग स्पष्ट करते. वर्णम् सादर केल्यानंतर रागसंगीताच्या रचनांमध्ये सर्वाधिक महत्त्व असलेली कृति आणि कीर्तन सादर केले जाते.

स्थायी/अस्ताई – अंतरा

हिंदुस्थानी अभिजात संगीत पद्धतीच्या गायनप्रकारांतील गीताचे (चीज) दोन भाग आहेत : पहिला अस्ताई (स्थायी), दुसरा अंतरा. पूर्वांगप्रधान रागात अस्ताईचा विस्तार व रागाचे स्वरूप साधारणत: मंद्र व मध्य सप्तकांतील स्वर घेऊन दाखवितात. अंतर्‍यामध्ये मध्य आणि तार या सप्तकांतले स्वर येतात. उत्तरांगप्रधान रागांच्या विस्तारात मात्र तारसप्तकातील स्वरही अस्ताईमध्ये (स्थायीमध्ये) येतात. अस्ताई-अंतरा मिळून गीतकल्पना पूर्ण होते. अस्ताई व अंतरा यांमध्ये पहिल्या समेपर्यंतचा भाग पुन:पुन्हा म्हटला जातो.

सी. रामचंद्र

सी. रामचंद्र : (१२ जानेवारी १९१८— ५ जानेवारी १९८२). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक व पार्श्वगायक. मूळ नाव रामचंद्र नरहर चितळकर. ‘सी. रामचंद्र’ हे संक्षिप्त नाव त्यांनी सिनेदिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरून धारण केले. आपल्या निकटवर्तीयांत ते ‘अण्णा’ म्हणून प्रसिद्ध होते. आर्. एन्. चितळकर, श्यामू, राम चितळकर, सी. रामचंद्र व अण्णासाहेब अशा विविध नावांनी त्यांनी संगीतदिग्दर्शन व पार्श्वगायन केले. त्यांचा जन्म पुणतांब्याचा (जि. अहमदनगर ). पुणतांब्याजवळील चितळी हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस होते.

राग परिचय

हिंदुस्तानी एवं कर्नाटक संगीत

हिन्दुस्तानी संगीत में इस्तेमाल किए गए उपकरणों में सितार, सरोद, सुरबहार, ईसराज, वीणा, तनपुरा, बन्सुरी, शहनाई, सारंगी, वायलिन, संतूर, पखवज और तबला शामिल हैं। आमतौर पर कर्नाटिक संगीत में इस्तेमाल किए जाने वाले उपकरणों में वीना, वीनू, गोत्वादम, हार्मोनियम, मृदंगम, कंजिर, घमत, नादाश्वरम और वायलिन शामिल हैं।

राग परिचय