कल्याण गायन समाज

कल्याण (ठाणे जिल्हा) येथील संगीताच्या प्रचार-प्रसार व संवर्धनार्थ कार्यरत असलेली एक नामवंत संस्था. तिची स्थापना दिनकर रघुनाथ तथा काकासाहेब बर्वे आणि त्यांच्या संगीतप्रेमी सहकाऱ्यांनी १० जुलै १९२६ रोजी देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांच्या स्मरणार्थ केली. संगीत शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच संगीताची अभिरुची वाढावी, या उद्देशाने तिची सुरुवात झाली. या क्षेत्रात गेली नऊ दशके ही संस्था अव्याहतपणे कार्यरत आहे.

ओडिसी नृत्य

ओरिसा प्रांतातील एक अभिजात नृत्यप्रकार.  भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये ओडिसी नृत्याचा उल्लेख एक शास्त्रीय नृत्यप्रकार म्हणून केला असून हा नृत्यप्रकार ‘ओडू’ म्हणजे ओरिसाकडून आला आहे. हा भारतातील एक अत्यंत पुरातन नृत्यप्रकार मानला जातो. ओरिसातील नृत्यपरंपरा फार जुनी आहे. इ. स. पू. दुसऱ्या शतकात खारवेल हा जैन राजा ओरिसामध्ये राज्य करीत असताना त्याने प्रजेच्या रंजनांसाठी ‘तांडव’ व ‘अभिनय’ हे नृत्यप्रयोग सादर केल्याचा उल्लेख उदयगिरी येथील हाथीगुंफेच्या शिलालेखात आढळतो. ह्याच काळात उभारलेल्या मंदिरांतील शिल्पांतूनही विविध नृत्याविष्कार शिल्पित केलेले आढळून येतात.

एम. एस. सुब्बुलक्ष्मी

सुब्बुलक्ष्मी, एम. एस. : (१६ सप्टेंबर १९१६ – ११ डिसेंबर २००४). कर्नाटक संगीतशैलीतील श्रेष्ठ भारतीय गायिका व  सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी. त्यांचे पूर्ण नाव मदुराई षण्मुखवाडिवु सुब्बुलक्ष्मी असे आहे. पुढे त्या ‘एम. एस. सुब्बुलक्ष्मी’ ह्या नावाने संगीतक्षेत्रात ख्यातनाम झाल्या. त्यांचा जन्म मदुराई येथे झाला. त्यांना लहानपणी कुंजम्मा म्हणत. त्यांच्या आई षण्मुखवाडिवु या नामवंत वीणावादक होत्या, तर त्यांच्या आजी अक्कमल या व्हायोलिनवादक होत्या. या दोघींच्या संगीताचा वारसा सुब्बुलक्ष्मी यांना लाभला.

एम. एल. वसंतकुमारी

वसंतकुमारी, एम. एल. : (३ जुलै १९२८ – ३१ ऑक्टोबर १९९०). कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका व संगीतकार आणि ख्यातकीर्त चित्रपटगीत गायिका. त्यांचे पूर्ण नाव मद्रास ललितांगी वसंतकुमारी. त्या ‘एमएलव्ही’ या नावानेही लोकप्रिय आहेत. पुरुषप्रधान गायन संस्कृतीमध्ये त्यावेळी एम. एल. वसंतकुमारी आणि त्यांच्या समकालीन डी. के. पट्टम्मल, एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना कर्नाटक संगीतातील महिला त्रिमूर्ती म्हणून गौरविण्यात आले होते.

अशोक दामोदर रानडे

रानडे, अशोक दामोदर : (२५ नोव्हेंबर १९३७ – ३० जुलै २०११). भारतातील संस्कृती-संगीतशास्त्राचे अध्वर्यू, संगीतशास्त्रज्ञ-रचनाकार, गायक व गुरू म्हणून विख्यात. संगीतविचाराच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मौलिक व व्यापक असे आहे. त्यांचा जन्म दामोदर व काशीबाई या सुशिक्षित-संगीतप्रेमी दांपत्यापोटी पुणे येथे झाला. ते दोन वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. पुढे ते पुण्याहून मुंबईस आले. त्यांचे शालेय शिक्षण आर्यन हायस्कूल येथे झाल्यावर त्यांनी एल्एल्. बी. (१९६०, मुंबई विद्यापीठ), एम.ए. मराठी व इंग्रजी (१९६२ व १९६४, विल्सन कॉलेज) या पदव्या प्राप्त केल्या.

राग परिचय

हिंदुस्तानी एवं कर्नाटक संगीत

हिन्दुस्तानी संगीत में इस्तेमाल किए गए उपकरणों में सितार, सरोद, सुरबहार, ईसराज, वीणा, तनपुरा, बन्सुरी, शहनाई, सारंगी, वायलिन, संतूर, पखवज और तबला शामिल हैं। आमतौर पर कर्नाटिक संगीत में इस्तेमाल किए जाने वाले उपकरणों में वीना, वीनू, गोत्वादम, हार्मोनियम, मृदंगम, कंजिर, घमत, नादाश्वरम और वायलिन शामिल हैं।

राग परिचय