येहूदी मेन्युइन
मेन्युइन, येहूदी : (२२ एप्रिल १९१६ – १२ मार्च १९९९). प्रख्यात अमेरिकन व्हायोलिनवादक. भारतीय संगीताच्या संदर्भात त्यांची कामगिरी विशेष मोलाची मानली जाते. त्यांचा जन्म न्यूयॉर्क शहरात रशियन ज्यू (यहुदी) कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील मोशे हे राब्बींच्या (सामान्यतः ज्यू विद्वानांना तसेच ज्यू धार्मिक ग्रंथ व तत्त्वे शिकविणाऱ्यांना ही उपाधी लावली जाते) कुटुंबातील होते. १९१९ च्या उत्तरार्धात मोशे आणि त्यांची पत्नी मारुथा अमेरिकन नागरिक बनले आणि त्यांनी कुटुंबाचे नाव बदलून मेन्युइन केले. येहूदींची आई पियानोवादक होती व त्यांच्याकडून येहूदींना संगीताचे बाळकडू मिळाले.
- Read more about येहूदी मेन्युइन
- Log in to post comments
- 9 views
मुश्ताक हुसेन खाँ
खाँ, मुश्ताक हुसेन : (१८७८ – १९६४). भारतातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रामपूर – सहस्वान या घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यामधील सहस्वान या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या कुटुंबामध्ये पारंपरिक संगीताचे वातावरण होते. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांचे वडील उस्ताद कल्लन खाँ यांच्याकडे त्यांच्या संगीताच्या प्रारंभिक शिक्षणाची सुरुवात झाली. त्यांनी त्यांचे आजोबा उस्ताद हैदर खाँ यांच्याकडूनही संगीताचे शिक्षण घेतले.
- Read more about मुश्ताक हुसेन खाँ
- Log in to post comments
- 1 view
मारवा थाटातील राग
हिंदुस्थानी संगीतशास्त्रातील पं. भातखंडेप्रणीत राग-वर्गीकरण पद्धतीनुसार ‘रे’ (कोमल), ‘म’ (तीव्र) व इतर स्वर शुद्ध असलेला मारवा थाट होय. मारवा, सोहनी, पूरिया, ललित पूर्वा, पूर्वा कल्याण, मालीगौरा, जेत (दोन प्रकार), भटियार, भंखार, साजगिरी, ललिता गौरी इ. प्रमुख राग या थाटात मोडतात. दक्षिणात्य संगीतातील ‘गमनश्रम’ थाटाशी ह्यांचे साधर्म्य आहे. थाटाचे नाव ज्यावरून पडले, त्या मारवा रागात आधारस्वर ‘सा’ (षड्ज) कमी वेळा व वक्र चलनांतून वापरण्याच्या वैशिष्ट्यामुळे विशेष आर्तता व आकर्षण येते, असे सर्वसाधारण मान्य मत आहे.
संदर्भ :
- Read more about मारवा थाटातील राग
- Log in to post comments
- 8 views
मल्लिकार्जुन मन्सूर
मन्सूर, मल्लिकार्जुन भीमरायप्पा : (३१ डिसेंबर १९१० – १२ सप्टेंबर १९९२). हिदुस्थानी संगीतातील जयपूर-अत्रौली घराण्याचे श्रेष्ठ गायक. त्यांचा जन्म मन्सूर (कर्नाटक) येथे झाला. मन्सूरांचे आरंभीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य मिरजेचे पं. नीळकंठबुवा यांच्याकडे झाले. पुढे जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाखाँ यांचे पुत्र मंजीखाँ आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे बंधू भूर्जीखाँ यांच्याकडे मन्सूर यांनी पुष्कळ वर्षे तालीम घेतली. विशेषत: मंजीखाँ यांच्या प्रतिभावंत पण बंडखोर गायकीचा मन्सूरांच्या शैलीवर विलक्षण प्रभाव दिसून येतो.
- Read more about मल्लिकार्जुन मन्सूर
- Log in to post comments
- 29 views
भास्करबुवा बखले
खले, भास्करबुवा रघुनाथ : ( १७ ऑक्टोबर १८६९ – ८ एप्रिल १९२२ ). एक अष्टपैलू, चतुरस्त्र प्रतिभेचे श्रेष्ठ गायक कलावंत; गायनाचार्य व अभिजात नाट्यसंगीताच्या परंपरेचे प्रवर्तक. भास्करबुवांचा जन्म बडोदे संस्थानातील कठोर या गावी झाला. घरची गरिबी असल्याने प्राथमिक शालेय शिक्षण व त्यानंतर संस्कृत पाठशाळेतले शिक्षण त्यांना फार कष्टाने करावे लागले. त्यांचा आवाज लहानपणापासून गोड असल्यामुळे वर्गशिक्षक त्यांना वारंवार संस्कृत श्लोकपठण करायला लावीत. त्यांच्या या गुणांमुळे पिंगळेबुवा नावाच्या हरिदासाकडे त्यांची संगीतशिक्षणाची सोय झाली.
- Read more about भास्करबुवा बखले
- Log in to post comments
- 22 views
राग परिचय
हिंदुस्तानी एवं कर्नाटक संगीत
हिन्दुस्तानी संगीत में इस्तेमाल किए गए उपकरणों में सितार, सरोद, सुरबहार, ईसराज, वीणा, तनपुरा, बन्सुरी, शहनाई, सारंगी, वायलिन, संतूर, पखवज और तबला शामिल हैं। आमतौर पर कर्नाटिक संगीत में इस्तेमाल किए जाने वाले उपकरणों में वीना, वीनू, गोत्वादम, हार्मोनियम, मृदंगम, कंजिर, घमत, नादाश्वरम और वायलिन शामिल हैं।