कृष्णराव गुंडोपंत गिंडे (के. जी.)

गिंडे, कृष्णराव गुंडोपंत (के. जी.) : (२६ डिसेंबर १९२५ – १३ जुलै १९९४). भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रातील भातखंडे परंपरेतील एक निष्ठावंत गायक, संगीतज्ञ व संगीत रचनाकार. ते ‘सुजनसुत’ म्हणूनही परिचित होते. त्यांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात बैलहोंगळ या गावी एका मध्यमवर्गीय संगीत व नाटक प्रेमी कुटुंबात झाला. गिंडे कुटुंबातील हे आठवे अपत्य. त्यांच्या आईचे नाव राधाबाई. कृष्णरावांचे वडील गुंडोपंत यांनी शिष्यवृत्तीवर शालेय शिक्षण बेळगावात पूर्ण करून एल.सी.पी.एस. ही वैद्यकशास्त्रातील पदवी घेतली होती.

कुंदनलाल सैगल

सैगल, कुंदनलाल : (४ / ११ एप्रिल १९०४–१८ जानेवारी १९४७). अखिल भारतीय कीर्तीचे थोर गायक आणि चित्रपट अभिनेते. त्यांचा जन्म जम्मू येथे एका मध्यमवर्गीय सुशिक्षित पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. या दांपत्याच्या चार मुलांपैकी कुंदनलाल हे तिसरे अपत्य होय. त्यांच्या बालपणी त्यांची आई त्यांना धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन यांसारख्या पारंपरिक शैलीत गायल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयातच कुंदनलाल यांच्यावर झाले.

किशन महाराज

पंडित किशन महाराज : (३ सप्टेंबर १९२३ – ४ मे २००८). बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक. त्यांचा जन्म वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील कबीरचौरा येथे एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. त्यांचे वडील पं. हरी महाराज यांच्याकडे त्यांनी बालवयापासून तबलावादनाचे शिक्षण घेतले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी त्यांचे चुलते पं. बलदेव सहाय यांचे शिष्य व बनारसचे श्रेष्ठ वादक पं. कंठे महाराज यांच्याकडून तबल्याची तालीम घेतली.

कल्याण गायन समाज

कल्याण (ठाणे जिल्हा) येथील संगीताच्या प्रचार-प्रसार व संवर्धनार्थ कार्यरत असलेली एक नामवंत संस्था. तिची स्थापना दिनकर रघुनाथ तथा काकासाहेब बर्वे आणि त्यांच्या संगीतप्रेमी सहकाऱ्यांनी १० जुलै १९२६ रोजी देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांच्या स्मरणार्थ केली. संगीत शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच संगीताची अभिरुची वाढावी, या उद्देशाने तिची सुरुवात झाली. या क्षेत्रात गेली नऊ दशके ही संस्था अव्याहतपणे कार्यरत आहे.

ओडिसी नृत्य

ओरिसा प्रांतातील एक अभिजात नृत्यप्रकार.  भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये ओडिसी नृत्याचा उल्लेख एक शास्त्रीय नृत्यप्रकार म्हणून केला असून हा नृत्यप्रकार ‘ओडू’ म्हणजे ओरिसाकडून आला आहे. हा भारतातील एक अत्यंत पुरातन नृत्यप्रकार मानला जातो. ओरिसातील नृत्यपरंपरा फार जुनी आहे. इ. स. पू. दुसऱ्या शतकात खारवेल हा जैन राजा ओरिसामध्ये राज्य करीत असताना त्याने प्रजेच्या रंजनांसाठी ‘तांडव’ व ‘अभिनय’ हे नृत्यप्रयोग सादर केल्याचा उल्लेख उदयगिरी येथील हाथीगुंफेच्या शिलालेखात आढळतो. ह्याच काळात उभारलेल्या मंदिरांतील शिल्पांतूनही विविध नृत्याविष्कार शिल्पित केलेले आढळून येतात.

राग परिचय

हिंदुस्तानी एवं कर्नाटक संगीत

हिन्दुस्तानी संगीत में इस्तेमाल किए गए उपकरणों में सितार, सरोद, सुरबहार, ईसराज, वीणा, तनपुरा, बन्सुरी, शहनाई, सारंगी, वायलिन, संतूर, पखवज और तबला शामिल हैं। आमतौर पर कर्नाटिक संगीत में इस्तेमाल किए जाने वाले उपकरणों में वीना, वीनू, गोत्वादम, हार्मोनियम, मृदंगम, कंजिर, घमत, नादाश्वरम और वायलिन शामिल हैं।

राग परिचय