केसरबाई केरकर

केरकर, केसरबाई : (१३ जुलै १८९२ – १६ सप्टेंबर १९७७). हिंदुस्थानी संगीतशैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याच्या ख्यातनाम मान्यवर गायिका. त्यांचा जन्म गोव्यातील केरी (तालुका फोंडा) या गावी गोमंतकातील संगीतपरंपरा असलेल्या कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाई होते. लहानपणी गावात होणाऱ्या गवळणकाला (श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारलेली मुलींनी केलेली नाटिका) उत्सवात त्या श्रीकृष्णाची भूमिका करत. त्यांची भूमिका पाहण्यासाठी व गायन ऐकण्यासाठी परगावांहूनही लोक येत असत. वयाच्या आठव्या वर्षी कोल्हापूर येथील वास्तव्यात त्यांनी किराणा घराण्याचे उ. अब्दुल करीमखाँ यांच्याकडे गायन शिकायला आरंभ केला.

किशोरी आमोणकर

आमोणकर, किशोरी : (१० एप्रिल १९३१ – ३ एप्रिल २०१७). हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्याच्या एक श्रेष्ठ व प्रतिभासंपन्न गायिका. त्यांच्या जन्म मुंबई येथे झाला. जयपूर घराण्याच्या विख्यात गायिका गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर व माधवदास भाटिया यांच्या त्या ज्येष्ठ कन्या. किशोरीताईंचे शालेय शिक्षण मुंबई येथील बालमोहन व प्रार्थना समाज या शाळांमध्ये झाले. त्यानंतर जयहिंद महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले.

उस्ताद अमीरखाँ

अमीरखाँ : (१५ ऑगस्ट १९१२ – १३ फेब्रुवारी १९७४). विसाव्या शतकातील ख्यातकीर्त भारतीय ख्यालगायक. उस्ताद अमीरखाँ हे इंदूर घराण्याचे प्रवर्तक म्हणून सुविख्यात आहेत. त्यांचा जन्म अकोला येथे झाला आणि त्यांचे पालनपोषण इंदूर येथे झाले. आजोबा छंगेखाँ व वडील शाहमीरखाँ यांच्याकडून संगीताचा वारसा त्यांना वंशपरंपरेने लाभला. त्यांचे पूर्वज हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील कलनौर येथील मूळ रहिवासी होते. आजोबा छंगेखाँ हे मोगल बादशाह बहादूरशहा जफर यांच्या दरबारात गायक होते, तर वडील शाहमीरखाँ हे इंदूर येथे होळकरांच्या दरबारात सारंगी व बीन वादक म्हणून काम करत.

होरी

उत्तर हिंदुस्थानी संगीतप्रकारातील एक शृंगार रसप्रधान गायन-प्रकार. याचा विषय प्रामुख्याने कृष्णाच्या रासलीला आणि राधा व गोपिकांच्या संगतीने रंगणारी होळी हा असतो. यातील वर्णन सहसा ब्रज भाषेतच असते. पूर्वी होरी धृपद गायक कलाकारच सादर करीत असत. धृपदाप्रमाणेच हा गायन प्रकार भारदस्त आणि बोजदार असे. हा गायनप्रकार धमार तालात गायला जाई, त्यामुळे धमार या प्रकाराला ‘पक्की होरी’ असेही म्हटले जाई. ख्याल गायनाप्रमाणे यात ताना घेतल्या जात नाहीत. बोलबनाव, दुगुण, तिगुन, गमक, बोलतान आदीने हा प्रकार खुलवत नेत असत. अलीकडे या गायनासाठी दीपचंदी तालदेखील उपयोगात आणला जाऊ लागला आहे.

स्वाती तिरूनल

स्वाती तिरूनल : (१६ एप्रिल १८१३ — २७ डिसेंबर १८४६). कुलशेखर वंशातील त्रावणकोर संस्थानचा एक कलाभिज्ञ, संगीतप्रेमी कर्तबगार राजा. पूर्ण नाव स्वाती तिरूनल रामवर्मा. त्यांचा जन्म राजा रामवर्मा कोईल थम्पुरण आणि महाराणी गौरी लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला. त्यांच्या मोठ्या बहिणीचे नाव रुमिणीबाई. त्यांचे धाकटे भाऊ उथरम तिरूनल मार्तंडवर्मा होत. तिरूनल दोन वर्षांचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मावशी गौरी पार्वतीबाई यांनी राज्यकारभार हाती घेतला आणि राजपुत्रांचे संगोपन केले. तिरूनल यांचे वडील संस्कृत पंडित होते.

राग परिचय

हिंदुस्तानी एवं कर्नाटक संगीत

हिन्दुस्तानी संगीत में इस्तेमाल किए गए उपकरणों में सितार, सरोद, सुरबहार, ईसराज, वीणा, तनपुरा, बन्सुरी, शहनाई, सारंगी, वायलिन, संतूर, पखवज और तबला शामिल हैं। आमतौर पर कर्नाटिक संगीत में इस्तेमाल किए जाने वाले उपकरणों में वीना, वीनू, गोत्वादम, हार्मोनियम, मृदंगम, कंजिर, घमत, नादाश्वरम और वायलिन शामिल हैं।

राग परिचय